बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दयायाचिका करण्याचा अधिकारच नाही – राष्ट्रपती

1032

2012 साली संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपी विनय शर्मा याची दयायाचिका गृहमंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली आहे. मात्र राष्ट्रपतींनी बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दयायाचिका सादर करण्याचा अधिकारच नाही असे स्पष्ट करत गृहमंत्रालयाने या याचिकेवर पुन्हा विचार करावा असे सांगितले आहे. राजस्थानमधील सिरोही येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

निर्भया हत्याकांडातील अल्पवयीन आरोपी विनय शर्मा याने गृहमंत्रालयाकडे दयायाचिका दाखल केली होती. त्या याचिकेची फाईल गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली होती. ही याचिका रद्द करावी अशी शिफरास दिल्ली सरकारने देखील केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या