निसर्ग चक्रीवादळात आडमुठे धोरण घेणाऱ्या महावितरणच्या ठेकेदाराबाबत प्रचंड नाराजी – उदय सामंत

528

निसर्ग चक्रीवादळात महावितरणची यंत्रणा कोलमडली. महावितरणचे प्रचंड नुकसान झाले त्यावेळेस सहकार्य करण्यापेक्षा ज्यांनी आडमुठेपणा घेतला त्या ठेकेदारांना महावितरणने सहकार्य करू नये. त्याचबरोबर गणेशोत्सवात अखंड वीजपुरवठा करताना त्यांना महावितरणने त्यांच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी उदय सामंत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या कामाचा आढावा घेतला. हॉटेल व्यवसाय बंद असताना गेल्यावर्षीच्या सरासरीवर महावितरणने काढलेल्या बीलांबाबत सामंत यांनी नाराजी व्यक्त करत हॉटेलची वीज बीले मीटर प्रमाणे काढ़ा अशा सूचना त्यांनी केल्या.

रत्नागिरीत भूमिगत वीज जोडणी

रत्नागिरी तालुक्यात भूमिगत वीज जोडण्या करण्यात येणार असून त्याकरिता 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. भूमिगत वीजतारा टाकल्याने वादळातील नुकसान कमी होईल असे त्यांनी सांगितले.तसेच लॉकडाऊनच्या काळात सरासरी बीलांमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे त्याबाबत नागरिकांचे समुपदेशन करा असे सांगताना तक्रार निवारण केंद्राबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके आणि तालुकाप्रमुख प्रदीप साळवी उपस्थित होते

आपली प्रतिक्रिया द्या