संकट येण्याआधी उपाययोजना; ही देशातील पहिलीच घटना!

8758

कोरोनापाठोपाठ महाराष्ट्रावर निसर्ग चक्रिवादळाचे संकट आले. पण या संकटाला न घाबरता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सर्व यंत्रणेला जबाबदारी सोपवली. योग्य वेळी निर्णय घेतल्याने संकट येण्याआधी उपाययोजना करून वादळ आणि पावसापासून राज्याला वाचवले. जीवितहानी होऊ न देता सहिसलामत राज्यातील जनतेला संकटातून काढण्यात आले, अशी देशातील ही पहिलीच घटना असेल, अशा शब्दांत राष्ट्रीय शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविषय कृतज्ञता व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या