निशिगंधा सुतार भाजपमध्ये: रत्नागिरी जिल्हा परिषदेत भाजपचे खाते; काँग्रेस शून्य

354

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कॉंग्रेस सदस्या निशिगंधा सुतार यांनी शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. निशिगंधा सुतार यांच्या भाजप प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेत भाजपने आपले खाते खोलले आहे तर काँग्रेस पक्षाचे रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये स्थान शून्य झाले आहे.

2017 मध्ये रत्नागिरी जि. प.च्या निवडणूका झाल्या त्या निवडणूकांमध्ये शिवसेनेचे 39 जि.प.सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 15 जि.प .सदस्य आणि कॉंग्रेस एक जि.प.सदस्य निवडून आला होता. भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता.

शनिवारी राजापूर तालुक्यातील कॉंग्रेसच्या जि.प.सदस्या निशिगंधा सुतार यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे रत्नागिरी जि.प.मध्ये कॉंग्रेसचे स्थान शून्य झाले. भारतीय जनता पक्षाचे खाते खोलले गेले आहे. यावर प्रतिक्रीया देताना आमदार प्रसाद लाड म्हणाले की, रत्नागिरी जि. प.कॉंग्रेसमुक्त झाली आहे. येणार्‍या काळात रत्नागिरी जिल्ह्यात आणखी पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

कॉंग्रेस पक्षाला राजापूरमध्ये आणखी मोठा धक्का बसला आहे कारण काँग्रेसचे राजापूरचे तालुकाध्यक्ष भास्कर सुतार आणि अन्य काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक  पटवर्धन, सचिन वहाळकर, अ‍ॅड. बाबा परुळेकर, प्राचार्य डॉ. सुभाष देव, निलम गोंधळी, सतीश शेवडे, प्रशांत डिंगणकर, सुशांत चवंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टीका करणार्‍या तटरेंनी 15 वर्षात काय केले? 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनिल तटकंरे यांनी पूर परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका केली होती. त्यावर आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर देताना खासदार सुनिल तटकरे यांनी राज्यसरकारने काय केले नाही किंवा काय केले पाहीजे हे सांगण्यापेक्षा 15 वर्षात त्यांनी काय केले याचा विचार करावा. त्यांनी जर काम केले असते, नद्यांमधले गाळ उपसले असते तर आज पुर परिस्थिती निर्माण झाली नसती, असे लाड यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध प्रकारच्या 18 वस्तूंचे आज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळाली नसली तरी पुढील काळात ती मदत तातडीने मिळेल. कारण आज मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. काही ठिकाणी मदत मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. अनेक ठिकाणी पूल खचण्याचे, पूल वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत त्यावर लाड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात जी चुकीच्या पध्दतीने कामे झाली त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. यापुढे दर्जेदार कामे केली जातील.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत भाजपचे खाते; काँग्रेस शून्य

आपली प्रतिक्रिया द्या