निसान मोटारींच्या किमती वाढणार, जानेवारीपासून नवे दर लागू

303

एकीकडे हुंदाई इंडियाने जानेवारी महिन्यापासून आपल्या मोटारी महाग करण्याचे जाहीर केलेले असतानाच आता निसान इंडियानेही पुढच्या महिन्यापासून आपल्या मोटारींच्या किमतीत 5 टक्क्यांची वाढ करणार असल्याचे सांगितले. उपकरणे बनविण्यासाठी लागणारा खर्च महागाईमुळे वाढला आहे. त्यामुळे नाइलाजाने मोटारींच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचे निसानने स्पष्ट केले.

निसान आणि दॅटसनच्या सध्या उपलब्ध असलेल्या सर्वच मॉडेल्सच्या किमतीला 1 जानेवारीपासून नवे दर लागू केले जाणार आहेत. यातच दॅटसन गो, गो प्लस, रेडिगो या मोटारींसोबतच निकानच्या क्रिक्स, टेरानो, सनी, मायक्रा, मायक्रा ऑकिटव्ह वगैरे मोटारींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे निसान आणि हुंदाईसह मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांनीही आपापल्या गाडय़ांच्या किमती वाढविण्याचे जाहीर केले आहे. दुचाकी बनविणाऱया हीरो मोटोकॉर्पने आपल्या गाडय़ांमध्ये दोन हजारांपर्यंत वाढ होणार असल्याची घोषणा केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या