कश्मीरमध्ये इंटरनेट फक्त अश्लील चित्रपटांसाठीच वापरले जाते, नीती आयोगाच्या सदस्याचे वादग्रस्त वक्तव्य

419

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील इंटरनेट सेवा पूर्णत: बंद करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तेथील इंटरनेट सेवा बंद असल्याने स्थानिक लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. असे असतानाच जम्मू कश्मीरमधील इंटरनेट बंदीवरून नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘कश्मीरमध्ये इंटरनेट फक्त अश्लील चित्रपटांसाठीच वापरले जाते’, असे वक्तव्य सारस्वत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जम्मू कश्मीरमधील इंटरनेट सेवा अद्याप खंडीत का आहे यावर स्पष्टीकरण देताना, जम्मू कश्मीरमधील नेते आंदोलने भडकविण्यासाठी इंटरनेटचा वारक करतात असा आरोप देखील सारस्वत यांनी केला आहे. ‘कश्मीरमध्ये इंटरनेट नसल्याने काय फरक पडतोय? इंटरनेटवर ते अश्लील चित्रपट सोडले तर दुसरं काय पाहतात? तेथील नेत्यांना दिल्लीत सुरू असलेली आदोलनं कश्मीरच्या रस्त्यावर देखील भडकवायची आहेत. त्यामुळे त्यांना इंटरनेट हवे आहे’, असे सारस्वत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या