शिवतीर्थावरील ही गर्दी सांगतेय की, शिवसेना एकच. शिवसेना ठाकरेंचीच. शिवसेना कडवट स्वाभिमानी शिवसैनिकांची. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. आणि कोणी आमच्या वाटेला येऊ नये. आमच्या वाटेला येऊन कोणी वाटमारी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याच वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचा वटवृक्ष काहींनी कापण्याचा प्रयत्न केला, पण शिवसेना कधीही संपणारी नाही. शिवसेना संपत नसते, तर संपवत असते, असा विश्वास शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी लगाला.
गेली ती फळं आणि उरली तरी शिवसेनेला घट्ट पकडून ठेवणारी मुळं असे त्यांनी सांगितले. लाडक्या बहिणींना या सरकारने दीड हजार रुपये दिले, पण जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च कमी केला असता तर बहिणींना तीन हजार रुपये देता आले असते, असा टोलाही त्यांनी लगावला. लाडक्या बहिणींना मदत करतात, पण राज्यात महिला अत्याचाराचे 47 हजार गुन्हे दाखल आहेत, 25 हजार मुली बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याला रश्मी ठाकरे, शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते. तर व्यासपीठावर शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, अनंत गीते, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते राजन विचारे, विनायक राऊत, शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते सुनील प्रभू, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार प्रियंका चतुर्वेदी, राजाभाऊ वाझे, आमदार सुनील राऊत, सुनील शिंदे, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, रमेश कोरगावकर, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, उपनेते सचिन अहिर, नितीन बानुगडे-पाटील, उपनेत्या सुषमा अंधारे, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, सुप्रदा फातर्पेकर आदी मान्यवर उपस्थित होते.