नितीन गडकरींनी केली तुकाराम मुंढेंची केंद्रात तक्रार

1568

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरचे सीईओपद बळकावले आहे. मुंढे यांचे वर्तन हे अवैध आणि घोटाळेबाज आहे, अशी लेखी तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केद्र सरकारकडे केली आहे.

नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला तेव्हाच त्यांनी नागपूर स्मार्ट ऍड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओपदी जबाबदारी बेकायदा बळकावली आहे. निविदा रद्द करणे, कोरोनाच्या काळात कंत्राटी कामगारांचे काम थांबवणे असे निर्णय मुंढे यांनी घेतले. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी मुंढे यांच्यावर केलेल्या 20 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाचा उल्लेखही या तक्रारीत नितीन गडकरी यांनी केला आहे

आपली प्रतिक्रिया द्या