नितीन गडकरींच्या विमानाचे उड्डाण सुरक्षेसाठी रोखले, इंडिगोचे विमान माघारी

1195
indigo

सामना ऑनलाईन । नागपूर

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे नागपूर येथून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण ऐनवेळी रद्द करून पुन्हा टॅक्सी-वे वर आणण्यात आले आहे. धावपट्टीवरून उड्डाण करण्याआधी वैमानिकाला काही मोठा बिघाड असल्याचे जाणवल्याने विमान पुन्हा टॅक्सी-वे वर आणण्यात आले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार इंडिगो कंपनीचे 6E 636 हे विमान आज सकाळी नागपूरहून दिल्लीला रवाना होत होते. मात्र धावपट्टीवर पोहोचलेल्या या विमानात काही मोठा बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ विमानाचे उड्डाण रद्द केले आणि सर्व प्रवाशांना पुन्हा टॅक्सी-वेवर आणले.

आपली प्रतिक्रिया द्या