ज्यांना काम जमत नाही त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारावी, सरकारी अधिकार्‍यांना गडकरींनी सुनावले

काम न करणारे आणि ढिलाई करणारे अधिकारी नितीन गडकरी यांच्या रडारवर असतात. गडकरी यांनी पुन्हा एकदा काम न करणार्‍या सरकारी बाबुंना सुनावले आहे. मला रीझल्ट देणारे अधिकारी आवडतात, ज्यांना काम जमत नाही त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारावी असे गडकरी यांनी अधिकार्‍यांना सुनावले आहे.

नागपुरमध्ये रस्ते सुरक्षा कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “सरकारी अधिकार्‍यांमध्ये संवेदनशीलता नाही. जेव्हा जेव्हा अपघात होतो त्याचा तपास करून अपघातशुन्य धोरण कसे राबवता येईल याबाबत कोणीच विचार करत नाहीत. त्यामुळे सरकारी यंत्रणा अधिक संवेदनशील करून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे. अनेक सरकारी अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. एक अधिकारी काय काम करतोय हे दुसर्‍या अधिकार्‍याला माहितच नसतं. त्यामुळे अनेक अडचणी समोर येतात. सरकारी अधिकार्‍यांमध्ये संवाद, समन्वय आणि सहकार असणे गरजेचे आहे. जी व्यवस्था चालत नाही ती उखडून फेकावी असे माझे ठाम मत आहे. मला काम करणारी माणसं आवडतात. ज्यांना काम जमत नाही त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घ्यावी असेही गडकरी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या