विदर्भाच्या विकासाची नितीन गडकरींनी केली पोलखोल, मोठे गुंतवणूकदार येत नसल्याची दिली कबूली

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विदर्भात मोठी गुंतवणूक करायला गुंतवणूकदार तयार होत नसल्याचे समोर आले आहे. स्वत: नितीन गडकरी यांनी एका सेमिनारमध्ये बोलताना ही कबूली दिली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून सध्या नेटकरी राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

केंद्रीय महामार्ग व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे शनिवारी नागपूर येथे अमेझिंग विदर्भ या सेमिनारमध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाषण करताना त्यांनी विदर्भात कुणीच गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करायला पुढे येत नसल्याची खंत व्यक्त केली. ”विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न आम्ही करतोय पण हाती काही लागत नाही. 500 1000 कोटींची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार इथे येत नाही. अशा गुंतवणूकदारांची कमतरता असल्याने मोठे मोठे प्रोजेक्ट येत नाही”, असे नितीन गडकरी म्हणाले.

राज्यातले अनेक मोठे प्रोजेक्ट गुजरातला पळविण्यात आले. एअरबर, टाटा ड्रग पार्क, वेदांता फॉक्सकॉन सारखे लाखो कोटींची गुंतवणूक करणारे प्रोजोक्ट गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेत सरकारविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. एकीकडे मिंधे सरकार नवीन प्रोजेक्ट राज्यात आणण्यात असमर्थ ठरत असताना दुसरीकडे चाकण एमआयडीसीमधून तब्बल 50 हून अधिक कंपन्या गुजरात आंध्रप्रदेश कर्नाटक येथे स्थलांतरीत झाल्याचे समोर आले आहे.