३१ वर्षांच्या इतिहासात पिंपरी-चिंचवडला मिळाले पहिले अविवाहीत महापौर

36

सामना ऑनलाईन,पिंपरी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन काळजे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्याम लांडे यांनी माघार घेतल्यामुळे पिठासीन अधिकारी दौलत देसाई यांनी भाजपाच्या काळजे यांच्या निवडीचीअधिकृत घोषणा केली.

काळजे हे पिंपरी महापालिकेच्या इतिहासातील भाजपचे पहिले तर महापालिकेचे २४वे महापौर ठरले. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना त्यांच्या रुपाने प्रथमच महापौरपद मिळाले आहे हे देखील विशेष आहे.

काळजे हे या शहराचे पहिले अविवाहीत महापौर बनले आहेत, त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती दाखवण्यात आला असून वीट कारखाना, वाहतूकीसाठीच्या गाड्या, बांधकामासाठी लागणारे साहित्य पुरवणे असे इतर उद्योगही ते करतात. गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवली होती.

आपली प्रतिक्रिया द्या