नितीश कुमार-तेजस्वी यादव एकाच विमानात; जेडी(यू)च्या नेत्यानं दिली पहिली प्रतिक्रिया

बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडी(यू) अध्यक्ष नितीश कुमार आता किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. ते काय भूमिका घेणार यावरून चर्चांना उधाण आलं आहे. भाजप येन केन प्रकारे त्यांना आपल्या सोबत राहण्यासाठी मनवण्याच्या प्रयत्नात आहे. तर याच दरम्यान, दिल्लीकडे निघालेल्या नितीश कुमारांच्या विमानात तेजस्वी यादव देखील होते. ते दोघे मागेपुढे बसल्याचंही दिसत होतं. यामुळे तर देशभरातील वृत्तवाहिन्यांवर चर्चा सुरू होत्या.

याच संदर्भात विचारले असता, जेडी(यू) मंत्री एमडी झमा खान म्हणाले की, ‘आमच्या नेत्याची बैठक आहे, आज एनडीएची बैठक आहे. त्यासाठी ते दिल्लीकडे निघाले आहेत. यावेळी तेजस्वी यादव देखील जर त्यांच्यासोबत एकाच विमानमध्ये गेले असतील तर तो एक योगायोग आहे’.