नितीशकुमारांचा पक्ष ‘एनडीए’त, जदयु महाआघाडीतच -शरद यादव

11

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (जदयु) राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्याचा निर्णय घेतला असून आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दुसरीकडे जदयुचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी ‘हिंमत असेल तर मला पक्षातून काढून दाखवा’ असे आव्हान दिले आहे. दरम्यान, पाटणाच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर शरद यादव यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

नितीशकुमार यांच्या निवासस्थानाबाहेर शरद यादव समर्थक आणि राजद कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जदयुला एनडीएत सामील होण्यास हे कार्यकर्ते विरोध करीत होते. यावेळी नितीशकुमार समर्थक कार्यकर्तेही आले आणि दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या