धर्मांधांना घाबरून झायरा सारखी घरात बसणार नाही, कुस्तीपटू बबिताने तबलीगीवर केलेल्या पोस्टवरून ‘दंगल’

2006

संपूर्ण देश कोरोना व्हायरसचा सामना करत असतानाच सोशल मीडियावर देखील एक युद्ध सुरू आहे. हिंदुस्थानची स्टार महिला कुस्तीपटू बबिता फोगट हिने केलेल्या एका पोस्टवरून सोशल मीडियावर ‘दंगल’ सुरू आहे. बबिता फोगट हिने काही दिवसांपूर्वी तबलीगी जमातवर टीका करणारे ट्विट केले होते. यामुळे मोठा वाद झाला. आता सोशल मीडियावर तिच्याविरोधात कॅम्पेन सुरू करण्यात आले असून तिचे अकाउंट सस्पेंड करण्याची मागणी होत आहे, मात्र याला तिचे चाहते आणि ट्विटर युजर्सही जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. याच दरम्यान बबिता हिने एक व्हिडिओ शेअर केला असून यामुळे विरोधकांना आणखी मिरच्या लागल्या आहेत.

बबिता हिने ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एला ट्विटमुळे मला लोक धमक्या देत आहेत..परंतु मी लोकांच्या धमक्यांना घाबरून झायरा वसीमसारखी घरात बसणार नाही, असे तिने ठासून सांगितले आहे. अभिनेत्री झायरा वसीम हिने गेल्याच वर्षी धर्माचे कारण देत बॉलिवूडला रामराम केला होता. तत्पूर्वी तिला धमक्या मिळाल्या होत्या आणि तिच्या विरोधात फतवाही जारी करण्यात आला होता.

देशभरात तबलीगी जमातने कोरोना व्हायरस पसरवला अशा आशयाचे ट्विट तिने केले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील हेच म्हंटले होते. कारण जवळपास 30 टक्के रुग्ण हे तबलीगी जमातशी संबंधित असल्याचे समोर आले होते. याच संदर्भात ट्विट बबिता हिने ट्विट केले होते. तबलीगी जमातच्या लोकांमुळे कोरोना देशभरात पसरवला नसता तर लॉकडाऊन वेळीच संपले असते असेही ती म्हणते. तिच्या या ट्विटनंतर काही युजर्सने तिच्या विरोधात एक मोहीम उघडली आणि तिचे अकाउंट सस्पेंड करण्याची मागणी केली. या नंतर तिने एक व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली आणि विरोधकांना उत्तर दिले.

बबिता हिची बहीण गीता फोगट ही देखील मैदानात उतरली असून अन्य कुस्तीपटू यांनींनी बबिता हिची बाजू लावून धरली आहे. तसेच यामुळे दोन गट सोशल मिडी6 भिडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या