आधी थुंकले, शिवीगाळ केली; आता त्याच डॉक्टरांकडे जीव वाचवण्याची विनवणी

4871

दिल्लीतील निजामुद्दीन इथल्या तबलिगी जमातच्या मरकजमध्ये 9000 लोक सहभागी झाले होते. यातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार सुरू आहे. यातील काहींवर कानपुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या तबलिगी जमातच्या लोकांनी रुग्णालय कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले होते. आता त्याच डॉक्टर, कर्मचाऱ्याकडे ते जीव वाचवण्यासाठी विनवणी करताना दिसत आहेत. ‘दै. भास्कर’ने याबाबत वृत्त दिले आहे.

तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या काही नागरिकांना कानपुर येथील रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांना आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे. मात्र इथे ठेवलेल्या सगळ्यांनी उच्छाद मांडायला सुरुवात केली आणि वैद्यकीय कर्मचारी तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत गैरवर्तन करायला सुरुवात केली होती. हे रुग्ण डॉक्टरांवर थुंकायचे आणि त्यांना संसर्ग पसरवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच हॉस्पिटलमध्ये स्टाफसोबत शिवीगाळ करत होते. आता यातील तीन रुग्णांनी ढसाढसा रडत आपल्याला वाचवण्याची डॉक्टरांना विनवणी केल्याचे समोर आले आहे.

Live corona update – मुंबईतील रुग्णांचा आकडा 775 वर, आज 9 जणांचा मृत्यू

आम्हाला घरच्यांची, कुटुंबियांची आठवण येत असून काहीही करून कृपया आमचा जीव वाचवा, अशी विनवणी हे रुग्ण करत आहेत. यावेळी डॉक्टरांनी देखील त्यांना तुम्ही लवकर बरे व्हाल असे आश्वासन दिले. तसेच रुग्णालयात आपले वर्तन चांगले ठेवा, असेही डॉक्टर आणि स्टाफ त्यांना म्हणाला. सूचनांचे पालन करा आणि वेळोवेळी गोळ्या घेत रहा, असेही डॉक्टर त्यांना म्हणाले.

गाझियाबाद आणि कानपुर येथे तबलिगी जमातच्या लोकांनी गैरवर्तन केले होते. कानपुर नंतर गाझियाबाद येथे उपचारासाठी आलेल्या तबलिगी जमातच्या रुग्णांनी नर्सला पाहून अश्लील कृत्य आणि घाणेरडे इशारे केले होते. गाझियाबाद CMO ने स्थानिक पोलिसांना याबाबत पत्र पाठवून माहिती दिली होती. तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेली लोक रुग्णालयात कर्मचारी वर्गासोबत वाईट वागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या काही रुग्णांनी अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयसोलेशन वार्डात रुग्ण पॅन्ट काढून फिरत असून अश्लील इशारे आणि गाणी म्हणत आहेत. तसेच सिगारेटची मागणी करत असून नर्सला घाणेरडे इशाराही करत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करणे अशक्य होतं आहे, असेही पत्रात म्हंटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या