बीड पाठोपाठ लातूरमधील मशिदीत तबलीगी जमातचे 22 सदस्य आढळल्याने खळबळ

6665

संपूर्ण देशभरात तबलीगी जमातच्या सदस्यांनी कोरोनाचा प्रसात केल्याच्या घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रमध्येही बीड पाठोपाठ लातूर येथे तबलीगी जमातचे सदस्य सापडले आहेत. याआधी हरयाणामधून आलेल्या बारापैकी 8 जणांना कोरोना असल्याचे नुकतेच उघडकीस आले होते. या पार्श्‍वभूमीवर तपास केला असता गुरुवारी लातुरातील मशिदीतून तब्बल 22 परप्रांतीय तबलीगी तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

देशभरातच नव्हे तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लातूर जिल्हा यापासून दूर होता. मात्र एका फटक्यात तब्बल 8 कोरोना संक्रमित निलंगा येथील मशिदीमध्ये सापडल्याने धाकधूक वाढली. हरयाणा येथून प्रवास करत तब्बल बारा जण निलंगा शहरातील मशिदीमध्ये थांबलेले होते. जागरूक नागरिकांनी आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रशासनाची माहिती दिल्यामुळे हे कोरोना संक्रमित जाहीर झाले.

कारवाईचा इशारा देताच बीडमध्ये दोन मशिदीतून 24 जण तपासणीसाठी बाहेर पडल्याने खळबळ

लातूर येथील शेख अन्सार अमीर तबलिग जमात यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन दिले. या निवेदनामध्ये लातूर शहरातील मशिदीमध्ये तब्बल 22  जमात सदस्य असल्याचे त्यांनी कळवले. शासनाने जमात सदस्यांची माहिती दिली नाही तर कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्यामुळेच लातुरातील मशिदीमध्ये असलेले सदस्य प्रशासनासमोर आले. या सर्वांना प्रशासनाने ताब्यात घेतले असून त्यांचे लाळेचे नमुने आता तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. या प्रकारामुळे लातुरात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या