‘बेस्ट’च्या एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही! बेस्ट महाव्यवस्थापकांची ग्वाही

1019
best-bus

देशात आर्थिक मंदीमुळे अनेक बड्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात असली तरी ‘बेस्ट’मधील एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी औद्योगिक न्यायालयात दिली.

जागतिक मंदीचा फटका हिंदुस्थानलाही बसला आहे. त्यामुळे बिकट आर्थिक स्थितीतून मार्ग काढत नुकतेच सावरणार्‍या ‘बेस्ट’मधील कर्मचार्‍यांवर याचा परिणाम तर होणार नाही ना, अशा धास्तीने काही कामगार संघटनांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. मात्र यावेळी ‘बेस्ट’ प्रशासनाकडून बाजू मांडताना महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी एकाही कर्मचार्‍याची नोकरी जाणार नसल्याची ग्वाही उच्च न्यायालयात दिल्याचे ‘बेस्ट’च्या एका अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान,  ‘बेस्ट’मध्ये नव्याने दाखल होणार्‍या हजारो बस आणि त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पाहता ‘बेस्ट’ प्रशासनाने लवकरात लवकर नवीन भरती करावी अशी मागणीही कामगार संघटनांकडून करण्यात आली आहे.

36 हजार 389 कामगारांना दिलासा

‘बेस्ट’ उपक्रमाच्या किद्युत क परिकहन किभागात सध्या एकूण 36 हजार 389 कामगार कार्यरत आहेत, मात्र बिकट आर्थिक स्थितीतून ‘बेस्ट’ मार्ग काढीत असताना जगभरात आलेल्या मंदीमुळे पालिकेच्या ‘बेस्ट’ उपक्रमावर परिणाम तर होणार नाही ना, अशी शंका संघटनांनी औद्योगिक न्यायालयात जाऊन उपस्थित केली. यावर औद्योगिक न्यायालयाने ‘बेस्ट’ला विचारणा करून आपली बाजू मांडण्यास सांगितले होते, मात्र ‘बेस्ट’च्या निर्णायक भूमिकेमुळे 36 हजार 389 कामगारांना दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या