रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याविरोधात अविश्वास ठराव

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १९७ शिक्षकांची आंतर जिल्हा बदली करतांना जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तसेच शिक्षकाची आंतरजिल्हा बदली केल्यामुळे आज शिक्षकांची सहाशेहून अधिक पदे रिक्त रहाणार असल्याने  शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला असून अविश्वास ठरावासाठी ३० सप्टेंबर रोजी विशेष सभा होणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल विश्वासात घेत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.शिवसेनेच्या ३८ जिल्हापरिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणावा अशा मागणीचे निवेदन जिल्हापरिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यांना दिले होते.त्यानंतर अविश्वासाची कार्यवाही सुरु झाली.अविश्वास ठरावासाठी ३० सप्टेंबर रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या