मेट्रोच्या कामामुळे शनिवारी रात्री अंधेरी-कांदिवली पश्चिमेकडील वीज पुरवठा खंडित होणार

416

दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-2 अ च्या मार्गावर कामराज नगर येथे मोनोपोल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवार, 14 सप्टेंबर रोजी आणि 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजल्यापासून रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी पश्चिम भागातील वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या