कळवा भागात उद्या सहा तास वीज नसणार, टोरंट कंपनीची माहिती

शनिवारी दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कळव्यातील काहीं भागात वीज पुरवठा खंडित राहणार आहे. वीज पुरवठा दुरुस्तीसाठी वीज बंद करण्यात येणार आहे अशी माहिती टोरंट कंपनीने दिली आहे.

विटावा येथील 22 केव्ही सबफिडरची दुरूस्ती व निगराणीचे काम शनिवार 24 एप्रिल 2021 रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 11 ते 5 वेळेत कळवा- विटावा काही भागात वीज पुरवठा खंडीत राहणार आहे.

या फिडरच्या कामामुळे कळव्यातील गणपती पाडा, ग्रीनवर्ल्ड, शंकर मंदिर, कळवा रेल्वे स्थानक पूर्व, गोपाळराव नगर, वाघोबा नगर, छत्रपती शिवाजी महाराज तलाव, मुकुंद रोड, मुकुंद गेट, पर्‍याचे मैदान, निलांबरी, जकात नाका, गजानन नगर, स्मशानभूमी आदी परिसराचा वीज पुरवठा सकाळी 11 ते सायंकाळी 5 वेळेत बंद राहणार आहे अशी माहिती टोरंट कंपनीने दिली आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन टोरंट कंपनीने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या