आता सरकारी कार्यालयांमध्ये मीडियाला प्रवेश बंदी!

52

सामना ऑनलाईन । डेहरादून

उत्तराखंड सरकारनं प्रसारमाध्यमांसाठी एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पत्रकारांना सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. महत्त्वाच्या वेळी गरज असल्यास अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांना पत्रकारांना काही माहिती द्यायची असेल तर त्यांनी कार्यालयाच्या रिसेप्शन काऊंटरवर येऊन प्रसारमाध्यमांना माहिती द्यावी असं आदेशात म्हटलं आहे. सरकारी माहिती गोपनीय रहावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी २७ डिसेंबरला हा आदेश राज्यातील सगळ्या अधिकाऱ्यांना जारी केला आहे. त्यामुळे यापुढे पत्रकार सरकारी अधिकाऱ्यांना थेट कार्यालयात भेटू शकणार नाहीत.

मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बैठकीमध्ये चर्चा होणारी महत्वाची माहिती गुप्त ठेवण्यास सांगितलं आहे. मिडीयापर्यंत योग्य माहिती पोहचणे हा देखील या निर्णयामागचा मुख्य हेतू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. रोज संध्याकाळी ४ वाजता सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती मिडीयाला दिली जाणार असल्याचं उत्पल कुमार यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या