यंदा कोणतीही वाढ नाही, हप्त्याने फी घेणार, युवा सेनेमुळे कॉलेज विद्यार्थ्यांना दिलासा

880
yuva-sena

यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांची फी वाढणार नसून फी वसुलीही हप्त्याने केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून तसे निर्देश महाविद्यालयांना दिले आहेत. युवा सेनेच्या पाठपुराव्यामुळे विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करावा लागला. त्यादरम्यान उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाले होते. खासगी कंपन्यांमधील अनेकांना आपल्या नोकऱया गमवाव्या लागल्या. परिणामी नागरिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षात कोणत्याही अभ्यासक्रमांची फी वाढवू नये तसेच गरजू विद्यार्थ्यांनी विनंती केल्यास त्यांना हप्त्याने फी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठवले आहे. यंदाच्या वर्षी फी वाढ होऊ नये यासाठी युवासेनाप्रमुख व राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शशिकांत झोरे आणि शीतल देवरुखकर-शेठ यांनी विद्यापीठाचे पुलगुरू सुहास पेडणेकर यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊनच विद्यापीठाने हे परिपत्रक काढले.

आपली प्रतिक्रिया द्या