धक्कादायक! उत्तराखंडमधील 132 गावांमध्ये गेल्या 3 महिन्यात एकही मुलगी जन्मली नाही

55

सामना ऑनलाईन । डेहराडून

देशभरात ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ चा प्रचार होत असताना उत्तराखंडमधील तब्बल 132 गावांमध्ये गेल्या 3 महिन्यात एकही मुलगी जन्मली नसल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या गावांमधील जन्माच्या दाखल्यांवरून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या 3 महिन्यात उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातल्या 132 गावांत 216 मुलं जन्माला आली असून ही सर्व मुलं पुरुष जातीची आहेत. नवजात बालकांमध्ये एकही मुलगी नसल्याचे वृत्त समोर आल्याने प्रशासनालाही धक्का बसला आहे. ‘ज्या भागात मुलीच्या जन्माचा दर शून्य आहे किंवा अवघा एक आहे ती गावं आमच्या निदर्शनास आली आहेत. सध्या आम्ही त्या सर्व गावांवर लक्ष ठेवून आहोत. तसेच याबाबत सर्वेक्षण करून या मागील कारण शोधण्यात येणार आहे’, असे जिल्हा दंडाधिकाऱी डॉ. आशिष चौहान यांनी सांगितले. तसेच चौहान यांनी जिल्ह्यातल्या आशा कर्मचाऱ्यांसोबत बैठक बोलावली असून त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या