पाकिस्तानमध्ये महागाई नाहीच! मीडिया, जनता खोटे बोलतेय; पाकिस्तानी मंत्र्याचा आरोप

787

हिंदुस्थानला युद्धाची धमकी देणाऱया आणि कश्मीरमध्ये दहशतवाद पोसणाऱया पाकिस्तानचे कंबरडे सध्या महागाईने  मोडले आहे. महागाईने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. टॉमेटो 240 रुपये किलो गेला आहे. पण पाकिस्तानमध्ये महागाई नाहीच, मीडिया आाणि लोक खोटे बोलत आहेत, असा दावा इम्रान खान यांच्या मंत्र्याने केला आहे.

कराचीतील भाजी मंडईत टोमॅटो 240 किलो दराने विकले जात आहेत, मात्र इम्रान खान सरकारमधील आर्थिक सल्लागार अब्दुल हाफीज शेख यांनी हा भाव किलोला 17 रुपये असल्याचे सांगितले. त्यावर हा भाव चुकीचा असल्याचे पत्रकारांनी सांगितले. मात्र हाच भाव खरा असून लोक खोटे बोलत असल्याचा दावा त्यांनी केला. कोणत्या भाजी मंडईत 17 रुपये किलो भावाने टोमॅटो मिळतात, असे पत्रकारांनी त्यांना विचारल्यावर तुम्ही कोणत्याही भाजी मंडईत जा तिथे टोमॅटो स्वस्तच मिळतील, असे सांगितले.  गेल्या आठवडय़ात टोमॅटो प्रति किलो 300 रुपयांवर गेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या