काँग्रेसचेच मुख्यमंत्री म्हणतात मंदी नाही

479

वाहन उद्योगात आलेली मरगळ आणि बाजारात दिसणारा निरुत्साह यामुळे मंदीची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. यावरून सरकारला लक्ष्य करण्याची एकही संधी विरोधी पक्ष सोडत नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही हे आव्हान पाहून कॉर्पोरेट टॅक्समध्ये घट केली होती. परंतु पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये मंदी नसल्याचे म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखाती त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

सिंग म्हणाले की, “पंजाबमध्ये आर्थिक मंदी जाणवत नाही. एका मोठ्या ट्रॅक्टर कंपनीशी मी चर्चा केली. ट्रॅक्टरची विक्री वाढल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात 50 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. राज्यात ऊर्जा क्षेत्रात वाढ झाली आहे. देशात मंदी आहे असे लोक म्हणत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी त्याचे विश्लेषणही केले आहे. ही जागतिक मंदी आहे की देशात मंदी आहे हे मला माहीत नाही. परंतु त्याचा फटका पंजाबला बसलेला नाही. अनेक गुंतवणुकदारांनी पंजाबमध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या