किरकोळीचा अर्थसंकल्प

47

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नोटाबंदीनंतर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आयकर रचनेत मोठे बदल केले जातील अशी अपेक्षा होती. मात्र प्रामाणिक करदात्यांचा आजच्या अर्थसंकल्पानंतर भ्रमनिरास झाला आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ३ ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील आयकर १० टक्क्यांवरून ५ टक्के करण्याचा निर्णय घेतला. करदात्यांची अपेक्षा ही होती की ७ ते ८ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना आयकरात सवलत मिळाली. ३ लाखांपर्यंतचे उत्पन्न हे आयकरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

jaitley-budget

अर्थसंकल्पापूर्वी अपेक्षा काय होत्या

  • ४ लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त होऊ शकतं
  • ४ ते १० लाखापर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के आयकर लागू केला जाऊ शकतो
  • १० ते १५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के आयकर लागू शकतो
  • १५ ते २० लाखापर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के आयकर भरावा लागू शकतो
  • २० लाखावरच्या उत्पन्नावर ३० टक्के आयकर भरावा लागू शकतो

modi-budget

तज्ञांच्या मते हे शक्य होतं कारण, नोटाबंदीनंतर बहुतांश नागरिकांचे उत्पन्न किती आहे हे कळालं होतं. आयकर न भरणाऱ्यांची संख्याही कळाली होती. सव्वाशे कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशात २० लाख व्यापाऱ्यांनीच ५ लाख उत्पन्न दाखवलं, ९९ लाख लोकांनी २.५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न दाखवलं, ५२ लाख लोकांनी ५-१० लाख उत्पन्न दाखवलं, १.७२ लाख लोकांनी ५० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न दाखवलं होतं. हे विदारक चित्र बदलण्यासाठी आणि लोकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी आयकरात सवलत देऊन अधिकाधिक नागरीक आयकर कसा भरतील हे बघणं गरजेचं होतं. मात्र आयकर रचनेतील या किरकोळ बदलामुळे हे शक्य होईल असं चित्र दिसत नाही

आपली प्रतिक्रिया द्या