रस्त्यावर बाजार भरवणाऱ्या नगर परिषदांवर कारवाई करणार – पालकमंत्री

28

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात रस्त्यावर बाजार भरवण्यात येऊ नये. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्यावर बाजाराला परवानगी न देता बाजार समितीच्या आवारातच बाजार भरवावा, अन्यथा नगर परिषदा, पंचायतींवर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मौदा व कामठी तालुक्यातील प्रशासकीय कामांचा आढावा बैठकीत दिला.

याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व विकास कामांचा निधी खर्च करून येत्या वर्षात किती निधी लागणार आहे, याचे नियोजन करून यादी सादर करण्याचे निर्देश दिले.

पाणीटंचाईची कामे करताना पाणीटंचाईच्या तीनही आराखडे मंजूर आहेत. ३० जूनपर्यंत आराखड्यातील एकही काम शिल्लक ठेवू नका, अशा सूचनाही देण्यात आल्या. नियोजित कालावधीत शासनाचा निधी खर्च झाला नाही तर पुढील निधी देणे कठीण असल्याची सूचनाही देण्यात आली. नगर पंचायतींनी ३१ मार्चपर्यंत निधी खर्च केला नाही तर मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच लोकप्रतिनिधींनी कामे करवून घ्यावी. कामाचा दर्जा तपासावा.कृषी, पाणीपुरवठा, तहसिलदार, भूमिअभिलेख, जलंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा नगर पंचायतीअंतर्गत येणारी कामे या कामांचा आढावा घेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या