परळील्या उपजिल्हा रुग्णालयात औषधांच्या मोठा तुटवड्यामुळे रुग्णाचे मोठे हाल

76

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

मागील कांही महिन्यापासून परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा असून याठिकाणी कामांवर असलेले डॉक्टर औषधे नसल्याने रुग्णांना थेट बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. एकीकडे रुग्णालयातील कर्मचारी हे आपल्या मर्जीतील रुग्णांनाच औषध उपलब्ध करुन देत असून तर दुसरीकडे सर्व सामान्य रुग्ण मात्र उपचार अभावी तडफडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांचे असले तरी प्रत्यक्षात 50 खाटांवर असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता नाही. या रुग्णालयात असलेल्या सोनोग्राफी, रक्त तपासणी आदी सुविधा बंद आहेत. ताप, सर्दी, अंग दुःखी व उलटी अशा किरकोळ आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुठलेही औषध अथवा गोळी उपलब्ध नाही. इंजेक्शन सिरीजही नसल्याने हजर असलेले डॉक्टर रुग्णांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.

सर्व सामान्य रुग्णांना खाजगी दवाखाना किंवा थेट अंबाजोगाईला पाठविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे परळीत राज्याचे अनेक महत्वाचे राजकीय असतांनाही परळीच्या उपजिल्हा रुग्णालयास अवकळा प्राप्त झाली आहे. केवळ राजकिय नेत्यांची शिबीरे व शासनाकडून आलेल्या आदेशाचे सोपस्कार करण्या ऐवढे हे उपजिल्हा रुग्णालय उरले आहे. उपजिल्हा रुग्णालयात औषध तुटवडा व अनेक विभाग बंद असल्याने रुग्णांना नाईलाजस्तव खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या