मेगा ब्लॉक; लोकल प्रवासाचे उद्या नो टेन्शन

लोकलने प्रवास करणाऱया मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. उद्या रविवारी पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक नाही. त्यामुळे विकेडला बाहेर जाणाऱया प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र मध्य रेल्वेच्या खडवली ते आसनगावदरम्यान शनिवारी-रविवारी रात्री विशेष ट्रफिक आणि पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी काही उपनगरीय लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या मेल-एक्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकांवर मोठा परिणाम होणार आहे.