मला सध्यातरी लस घेण्याची गरज नाही- शरद पवार

कोरोनाकाळात जनता अडचणीत होती, त्यामुळे मी बाहेर पडलो. त्याच वेळी माझे वर्गमित्र ‘सीरम’ पंपनीचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी मला ‘बीसीजी’ची लस दिली. या लसीमुळे तुझी प्रतिकारशक्ती वाढेल, असे ते म्हणाले. आता कोरोना लसदेखील घेण्याबाबत त्यांनी सांगितले आहे. मात्र, मी नगरला जाऊन येतो, मग पाहू, असे त्यांना सांगितले आहे.

नगरला आल्यानंतर येथील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचा रेट पाहून मला सध्यातरी लस घेण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सांगितले आहे.

ज्यांना पदे दिली, त्यांच्याच अंगात आले 

‘राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यांना पदे दिली, मदत केली, विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या अंगात आले आणि ते दुसऱया पक्षात गेले. मात्र, मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली,’ असा टोला शरद पवार यांनी पिचड पिता-पुत्रांना लगाविला. दरम्यान, ‘अगस्ती कारखान्यावरील कर्जाच्या डोंगराला जबाबदार असणाऱया ‘शुक्राचार्यां’ना बाजूला हटवा; मी दोन-तीन वर्षांत कारखाना कर्जमुक्त करतो,’ असेही ते संगमनेरमध्ये म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या