नितीशकुमार म्हणतात…मोदींशी टक्कर देण्याची ताकद कोणातही नाही!

15

सामना ऑनलाईन, पाटणा

२०१९ सालातील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टक्कर देण्याची ताकद कोणातही नाही. त्यामुळे पुढची निवडणूकही तेच जिंकतील, असे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले.

‘महाआघाडी’तून बाहेर पडून भाजपशी युती करून सरकार स्थापल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आज पत्रकार परिषद घेतली. समंजसपणा आणि संयम दाखवत महाआघाडीचे सरकार चालवण्यासाठी आपण टोकाची पराकाष्ठा केली. मात्र परिस्थिती सहन करण्यापलीकडे गेली होती. त्यामुळे राजीनाम्याशिवाय आणि महाआघाडीतून बाहेर पडण्यावाचून आपणास पर्याय उरला नव्हता, असे नितीशकुमार यांनी सांगितले.

जनतेचा कौल यासाठी नव्हता
बिहारमध्ये जे काही घडले त्याच्याशी आपण सहमत नाही. ‘महाआघाडी’ तुटणे हे दुर्दैवी आहे. तेथील जनतेचा कौल यासाठी नव्हता, अशा शब्दांत संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली.

भाजप अध्यक्षपदावर मी खूश आहे
भाजपच्या अध्यक्ष पदावर मी खूश आहे. मनापासून आणि आनंदाने काम करत आहे. ते पद सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत अमित शहा यांनी केंद्रात मंत्रीपद स्वीकारण्यात त्यांना रस नसल्याचे आज सूचित केले. मला मंत्रीपदाकडे कृपया ढकलू नका, असेही ते मीडियाला उद्देशन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या