गांधी-नेहरू परिवार काँग्रेसची ब्रॅण्ड इक्विटी, अधीर रजंन यांची टीका

464

गांधीनेहरू परिवार ही काँग्रेसची ब्रॅण्ड इक्विटी आहे. त्यांच्या परिवाराशिवाय बाहेरची व्यक्ती हा पक्ष चालवू शकत नसल्याचे काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. ज्या स्थानिक पक्षांना कोणतीही विचारधारा नाही असे पक्ष कमकुकत झाले तरच कॉँग्रेसचे देशात पुनरागमन शक्य असल्याचे ते म्हणाले.

राजकारणात कोणत्याही पक्षाला कधीही ब्रॅण्ड इक्विटी महत्त्वाची असते. आताच्या परिस्थितीत भाजपचा विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशिवाय हा पक्ष चालेल का? असा प्रश्न करत चौधरी यांनी राजकारणातील ब्रॅण्ड इक्विटीचे महत्त्व अधोरेखित केले. गांधी कुटुंबाकडे असलेली प्रतिभा काँग्रेस पक्षातील अन्य कोणत्याही नेत्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.

सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता, परंतु रिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्कीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीदेखील त्यांनी कठीण परिस्थितीतही काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे 2004 आणि 2009 मध्ये सरकार स्थापन करण्यात यश आल्याचे चौधरी म्हणाले. भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षाचा सामना करण्याची ताकद स्थानिक पक्षांत नाही. काँग्रेसची विचारधारा जनमानसात खोलवर पोहचली असून काँग्रेसच भाजपशी मुकाबला करू शकते. काँग्रेसचे भविष्य उज्ज्वल आहे आणि पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत येईल, असा विश्वास काँग्रेस वर्किंग कमिटला असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या