हनुमानाचं ‘हे’ चमत्कारी मंदिर पाडणं अशक्य, मोठ-मोठ्या मशीनही बंद पडल्या

17

सामना ऑनलाईन । शाहजहाँपूर

उत्तर प्रदेशमध्ये हनुमानाचं असं एक मंदिर आहे जे पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र ते शक्य झालं नाही. राष्ट्रीय महामार्ग- २४ वर चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या मधोमध एक हनुमानाचं मंदिर येत आहे. रस्त्याच्या निर्मितीसाठी हे मंदिर पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले. मोठमोठ्या मशिनच्या साहाय्याने मंदिर पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र मशीन ऐनवेळी खराब होत असे, तर कधी जनरेटरच काम करत नसे. त्यानंतर स्थानिकांची मंदिराप्रती आणि हनुमानावरची श्रद्धा आणि भक्ती आणखीनचं दृढ झाली. सध्या मंदिर पाडण्याचं काम थांबण्यात आलं असून मंदिर न पाडण्यासाठी लोकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

कचियानी खेडाजवळ हनुमानाचं १३० वर्ष जुनं मंदिर आहे. राष्ट्रीय महामार्ग-२४च्या चौपदरीकरणाच्या निर्मितीच्या मधोमध हे मंदिर येत आहे. त्यामुळे महामार्गाच्या निर्मितीसाठी हे मंदिर पाडणे गरजेचे होते. त्यासाठी प्रयत्नही करण्यात आले मात्र ते सफल होऊ शकले नाहीत. अनेक मोठमोठ्या मशीन मंदिर पाडण्यासाठी मागवण्यात आल्या मात्र मंदिराची एक विटही या मशीन पाडू शकल्या नाहीत.

रस्ते बनवणाऱ्या कंपनीनं मंदिराजवळ एक पुजा केली आणि मंदिर दुसरीकडे स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंदिरातील हनुमानाची मुर्ती हलवण्याच प्रयत्न ज्यावेळी केला तेव्हा मुर्ती थोडीही हलली नाही, उलट मुर्ती हलवण्यासाठी आणलेली मशीन खराब झाली. हे पाहून स्थानिकांनी मंदिर तोडण्यास विरोध सुरू केला. मंदिर पाडण्याचे एवढे प्रयत्न करूनही मंदिर पाडणं शक्य होत नसेल तर आता हे मंदिर पाडू नये अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. तसेच मंदिराला पाडण्यात प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन करु असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या