वर्ष झालं तरी फलक कुणी काढेना! रत्नागिरी नगर परिषद करतेय काय?

468

रत्नागिरी नगर परिषद स्वच्छता मोहिम राबवत असली तरी नगरपरिषदेच्या आवारात एक वर्षापुर्वी लावलेला फलक कुणाला दिसत नाही. हा फलक अजून किती दिवस धूळखात रहाणार आहे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांर्गत भूमिगत विद्युत प्रणाली संदर्भात माहिती देण्यासाठी दिनांक २७ जुलै  २०१८ रोजीच्या  बैठकीचे निमंत्रण देणारा हा फलक २० ऑगस्ट २०१९ रोजीही तसाच नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ लटकतोय. स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरीची मोहिम राबवणाऱ्या रत्नागिरी नगरपरिषदेला हा धूळखात बसलेला फलक दिसत नाही. या फलकासमोर अनेक जण वाहने उभी करून नगरपरिषदेत जातात मात्र कुणीही त्या फलकाकडे लक्ष देत नाही हे दुर्देव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या