मुंबईकरांना पावसासाठी आठवडाभर वाट पाहावी लागणार

21
rain

सामना ऑनलाईन, मुंबई

कोकण, रायगड, पालघरमध्ये पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, परंतु मुंबईसह उपनगरात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल अशी शक्यताही वर्तवली आहे. मुंबईकरांना मुसळधार पावसासाठी आणखी आठवडाभर वाट पाहावी लागेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांची सध्या तरी उकाडय़ापासून सुटका होणार नाही असेच दिसतेय. केरळ, कर्नाटक या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचे स्कायमेटच्या महेश पलावत यांनी सांगितले.

मराठवाडा, विदर्भात येत्या 18 जुलैपासून मुसळधार

मराठवाडा, विदर्भात येत्या 18 जुलैपासून पावसाला सुरुवात होईल असा अंदाजही त्यांनी वर्तवला. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर मराठवाडा, विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. त्यानंतर या भागातही चांगला पाऊस पडेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या