हॉटेल, रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज बंद होणार

22
hotels
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून सर्व्हिस चार्ज बंद करण्याचा निर्णय सरकार लवकरच जाहीर करणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जात आहे. याआधीही सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंटधारकांनी ग्राहकांच्या नकळत त्यांच्याकडून सेवा कर घेणे योग्य नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतरही ३० ते ४० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंटधारक सेवा कराच्या नावाखाली ५ ते १० टक्के कर लावून ग्राहकांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे ग्राहकांना लुटणाऱया हॉटेल आणि रेस्टॉरंटची यादी तयार केली जात आहे आणि लवकरच त्यांच्याविरोधात नोटीस बजावली जाईल, असे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या