Video – देशात कोविड लसींचा तुटवडा नाही, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा दावा

देशात 12 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिली. तसेच देशात लसींचा बिल्कूल तुटवडा नाही असा दावाही हर्षवर्धन यांनी केला आहे. राज्यातील 11 आरोग्यमंत्र्यांशी हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. तेव्हा त्यांनी आकडेवारी सादर करत हा दावा केला आहे.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, “आज पर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे 14 कोटी 15 लाख डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. वाया गेलेल्या लसींना पकडून आतापर्यंत 12 कोटी 57 लाख 18 हजार डोस वापरण्यात आल्या आहेत. सध्या राज्यांकडे 58 लाखांचा लसींचा डोस आहे. तसेच 1 कोटी 16 लाख 84 हजार लसींचा लवकरच पुरवठा होईल असे हर्षवर्धन म्हणाले. देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा कुठलाच तुटवडा नाही असेही हर्षवर्धन म्हणाले.  

डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 एप्रिल पर्यंत 12 कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. देशात 66 हजार 689 लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. आतापर्यंत 91 लाख 4 हजार 680 आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर 56 हजार 69 हजार 734 आरोग्य कर्मचार्‍यांना दुसर्‍यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या