नागपूरात भाजपच्या पोस्टर्सवरून मोदी गायब

23

ऑनलाईन सामना । नागपूर

लाईक कराट्विट करा

आगामी वर्षात होणा-या नागपूर महापालिका निडणूकांच्या प्रचाराची भाजपने जोरदार तयारी सुरु केली असून जागोजागी नागपूर भाजपाने पोस्टर्स लावली आहेत. मात्र या पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची छायाचित्रे नाहीत. नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व संघाचा नागपूर हे गड मानले जात असल्यामुळे या पोस्टर्सवर मोदी व शहा यांची छायाचित्रे छापली नसावीत, असा जाणकारांचा अंदाज आहे.

विदर्भातील नगरपालिका निवडणूकांत भाजपला चांगले यश मिळाल्यामुळे आगामी नागपूर महापालिका निवडणूकांसाठी भाजपने पोस्टर प्रसिद्धी सुरु केली आहे. या पोस्टर्सवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या राज्यपदाधिका-यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे छायाचित्र नाही.

नागपूर महापालिकेची निवडणूक ही स्थानिक असल्यामुळे राष्ट्रीय नेत्य़ांऐवजी नागपूरातील मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची छायाचित्रे छापली असल्याचे भाजप पदाधिका-य़ांनी  सांगितले. नागपूरात स्वबळावर १०० जागा जिंकण्याचे भाजप प्रयत्न करणार आहे.

– See more at: https://www.saamana.com/vidarbha/no-mdi-on-bjp-election-posters-in-nagpur#sthash.h71ffryg.dpuf

आपली प्रतिक्रिया द्या