तंत्रशिक्षण दूरस्थ पद्धतीनं देता येणार नाही: सर्वोच्च न्यायालय

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘इंजिनीअरिंगसारखे कोणतेही तांत्रिक अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षण पद्धतीने देता येऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. दूरस्थ पद्धतीनं तंत्रशिक्षण घेण्यास मंजुरी देणारा ओडिशा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केला आहे. यावेळी न्यायालयाने देशातील सर्व विद्यापिठांना व कॉलेजेसना अशा प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देण्यास बंदी केली आहे.

तंत्रशिक्षण हे दूरस्थ पद्धतीने किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून शिकता येऊ शकत नाही. तंत्रशिक्षणाशी संबंधित सर्व अभ्यासक्रम नियमित वर्गांच्या माध्यमातूनच पूर्ण केले जाऊ शकतात. त्यामुळे देशभरातील विद्यापिठांनी अशा प्रकारे ऑनलाईन किंवा दूरस्थ पद्धतीने तंत्रशिक्षणाचे कोर्सेस देणे बंद करावेत असे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

दोन वर्षापूर्वी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण दूरस्थ पद्धतीने घेता येऊ शकत नसल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाने देखील दूरस्थ पद्धतीनं तंत्रशिक्षण देण्यावर बंदी घातली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या