श्रीनगरमधील 90 मतदार केंद्रात एकही मत पडले नाही

सामना ऑनलाईन । श्रीनगर

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात श्रीनगर मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. यावेळी तब्बल 90 मतदान केंद्रावर एकही मत पडले नसल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांश मतदान केंद्र इदगाह, खन्यार, हब्बा कडाल आणि बाटमालू भागातील आहेत. इदगाहमध्ये एकूण 3 टक्के तर खन्यारमध्ये 4 टक्के मतदान झाले.

ओमर अब्दुल्ला यांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या सोनवारसहीत सात विधानसभा मतदार संघात अवघे 3 ते 7 टक्के मतदान झाले आहे. गंडेरबल जिल्ह्यात सर्वाधित 27 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान बडगाममध्ये मतदान सुरू असताना फुटिरतावाद्यांनी जवानांवर दगडफेक केल्याची घटना देखील समोर आली आहे.