चित्रपट, वेब सीरिजना संरक्षण खात्याची एनओसी अनिवार्य

399

चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये हिंदुस्थानी लष्करी अधिकार्‍यांबाबत आक्षेपार्हरीत्या सादरीकरण केले जात असल्याची गंभीर दखल केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतली आहे. चित्रपट, वेब सीरिज आणि माहितीपट सुरक्षा दलांवर आधारित असतील तर त्यासाठी आधी संरक्षण मंत्रालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागेल, असे संरक्षण मंत्रालयाने सेंसॉर बोर्ड आणि माहिती प्रसारण मंत्रालयाला कळवले आहे.

अलीकडे काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये लष्करी अधिकारी आणि जवानांबद्दल चुकीचे सादरीकरण केले गेले तसेच लष्करी गणवेशाचा अवमान झाला अशा तक्रारी संरक्षण मंत्रालयाकडे आल्या होत्या. त्यात कोड-एम, एक्स एक्स एक्स अनसेंसर्ड (सीझन-2) या वेब सीरिजचा समावेश होता. काही प्रकरणांमध्ये माजी जवानांनी पोलिसातही तक्रारी दाखल केल्या आणि या वेब सीरिजच्या निर्मात्यांवर तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मकर कारवाईची मागणी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या