नोएडाचे जिल्हाधिकारी मनीष वर्मा यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर असभ्य शब्दांत टिप्पणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्सवर आपला एक इंटरव्ह्यु पोस्ट केला होता. या ट्वीटवर नोएडा/गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी मनीष वर्मा यांनी असभ्य भाषेत टिप्पणी केली होती. या कमेंटचा स्क्रीशॉट शेअर करून प्रशासनात संघाचे लोक बसले असून संविधानिक पदावर बसून द्वेष पसरवत आहेत असे श्रीनेत म्हणाल्या. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. गेल्या 10 वर्षांत नोकरशाहीत राजकारण वाढले आहे, या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणीही रमेश यांनी केली आहे.
यह DM Noida हैं, पूरे ज़िले की ज़िम्मेदारी है
देश के नेता विपक्ष राहुल गांधी के बारे में इनकी भाषा और विचार ज़रूर देखे जायें
साफ़ है प्रशासनिक अमले में संघियों की भरमार है – और अब वो संवैधानिक पद पर बैठ कर नफ़रत को हवा दे रहे हैं pic.twitter.com/880DD3EGn4
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) September 13, 2024