लय भारी! ‘Nokia’चा 10 हजारांहून कमी किंमतीचा बजेट फोन येतोय, वाचा फिचर्स

जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारपेठांपैकी एक असलेल्या हिंदुस्थानमध्ये आपला जम आणखी पक्का करण्यासाठी Nokia कंपनी लवकरच एक बजेट फोन लॉन्च करणार आहे. ‘Nokia 1.4’ असे या स्मार्टफोनचे नाव असणार असून यात जबरदस्त फिचर्स देण्यात येणार आहेत. पुढील महिन्यात हा फोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

नव्याने लॉन्च होणारा हा स्मार्टफोन Nokia 1.3 चे अपडेट व्हर्जन आहे. ‘Nokia 1.4’ पुढील महिन्यात लॉन्च होणार असला तरी लॉन्चिंगपूर्वी याचे फिचर्स, संभाव्य किंमत, व्हेरिएन्ट आणि कलर ऑप्शन लीक झाले आहेत.

‘टिप्स्टर’ने सुधांशु अंबोरने MySmartPrice च्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. वृत्तानुसार, ‘Nokia 1.4’ मध्ये ड्यूअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 4,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हिंदुस्थानमध्ये हा फोन ग्रे आणि ब्ल्यू कलरमध्ये लॉन्च होईल. तसेच फोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज असण्याची शक्यता असून मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.

nokia-1-4

फिचर्स –

‘Nokia 1.4’ फोनला 6.51 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात येणार असून स्क्रीन रिझॉल्यूशनही चांगले असणार आहे. 1.3GHz quad-core प्रोसेसरसह हा फोन लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती लीक झाली आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात येणार असून सेल्फीसाठी 6 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असणार आहे. सोबत फिंगर प्रिंट स्कॅनर, वाई-फाई, ब्लूटूथ आणि 3.5एमएम ऑडियो जॅकसह अन्य फिचर्स देण्यात येणार आहेत.

camera

किंमत –

‘Nokia 1.4’ ची किंमत हिंदुस्थानमध्ये 100 युरो अर्थात जवळपास 8 हजार 800 रुपये असण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या