उत्तर कोरियाने केली हायड्रोजन बॉम्बची चाचणी

66

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचा रविवारी दावा केला. सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सीने ही माहिती दिली आहे. उत्तर कोरियाने केलेली ही सहावी चाचणी आहे. क्षेपणास्त्र्ाातून डागता येईल, असा हायड्रोजन बॉम्ब विकसित करण्यात आला आहे.

उत्तर कोरियात सकाळी ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे वृत्त सर्व वृत्तवाहिन्यांनी दिले होते. मात्र हा भूकंप नसून उत्तर कोरियाने केलेल्या अणुचाचणीचा परिणाम असल्याचे नंतर स्पष्ट झाले. चीननेही हा भूकंप नसून संशयास्पद विस्फोट असल्याचे सांगितले. जपाननेही उत्तर कोरियाच्या अणुचाचणीला दुजोरा दिला आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जेंग उन याचे कृत्य कदापि खपवून घेतले जाणार नाही, असे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी म्हटले आहे.

 • हायड्रोजन बॉम्बमध्ये अणुबॉम्बपेक्षा १०० पट जास्त संहारक क्षमता, अणुबॉम्बची सर्व उपकरणे उत्तर कोरियातच विकसित केल्याचा दावा.
 • जुलै महिन्यात उत्तर कोरियाने दोन वेळा आयसीबीएम हॉसॉन्ग १४ ची यशस्वी चाचणी केली होती. त्याच्या दृष्टिक्षेपात अमेरिकेचा बराचसा भाग येण्याचा दावाही केला. त्यानंतर कोरियन द्वीपकल्पमध्ये तणाव वाढला होता.

किम जोंगने शेअर केले छायाचित्र

अणुचाचणीनंतर उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी हायड्रोजन बॉम्ब उपकरणासोबतचे छायाचित्र शेअर केले. छायाचित्रात काळा पोशाख परिधान केलेले किम जोंग हायड्रोजन बॉम्बचे निरीक्षण करताना दिसत आहेत. कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सीच्या माहितीनुसार किंम जेंग यांनी शास्त्रज्ञांसोबत अण्वस्त्र संस्थेचा दौरा केला. त्यांना काही सूचना केल्या.

जानेवारी २०१६ मध्ये चौथी अणुचाचणी केल्यानंतर लहान हायड्रोजन बॉम्ब बनवलाय असे उत्तर कोरियाने सांगितले होते. सहा किलो टनच्या या बॉम्बची क्षमता एका थर्मोन्युक्लियर डिवाईसच्या तुलनेत कमी होती, असे शास्त्र्ाज्ञांचे म्हणणे होते. त्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये उत्तर कोरियाने पाचवी अणुचाचणी केली. त्याहीपुढे जाऊन तांत्रिक सुधारणा करीत हायड्रोजन बॉम्ब बनवण्यात यश मिळवले आहे.

पाच अणुचाचण्या

 • २००६, २००९, २०१३, २०१६ साली उत्तर कोरियाने अणुबॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत.
 • ९ ऑक्टोबर २००६ रोजी पहिल्यांदा जमिनीच्या आत अणुचाचणी केली. अमेरिकेपासून अणुयुद्धाचा धोका असल्याचे कारण दिले होते.
 • २५ मे २००९ रोजी पुन्हा एकदा अणुचाचणी.
 • १३ जून २००९ रोजी युरेनियम एनरिचमेंट करून अण्वस्त्र्ाs आणि प्लूटोनियम अणुभट्टी बनवू असे सांगितले.
 • ११ मे २०१० रोजी न्यूक्लिअर फ्यूजन रिऍक्टर बनवण्याचा दावा केला.
 • १३ फेब्रुवारी २०१३- तिसरी अणुचाचणी.
 • १० डिसेंबर २०१५- हायड्रोजन बॉम्बची चाचणी क्षमता असल्याचा किंम उनचा दावा.
 • ६ जानेवारी २०१६- हायड्रोजन बॉम्बची चाचणी.
 • सप्टेंबर २०१६-पाचवी अणुचाचणी.

 

आपली प्रतिक्रिया द्या