राष्ट्रपतीपद स्वीकारणार नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं स्पष्टीकरण

15

सामना ऑनलाईन । नागपूर

काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रपती पदाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र ती केवळ चर्चा ठरणार असून तसे काहीही होणार नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.

येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या नावाची शक्याता असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते. संघानेही प्रसिद्धी पत्रक जारी केलेले नव्हते. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते.

मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आलो तेव्हाच राजकीय पदाचे दरवाजे बंद केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघात काम करताना यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्याची चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे. त्यामुळे आता आपण राष्ट्रपतीपदाचा प्रस्ताव आला तरी तो स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या