चिदंबरम पाठोपाठ ‘या’ काँग्रेस नेत्यांवरही कारवाईची टांगती तलवार

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणात माजी केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याविरोधात ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहे. विविध प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि अशा आरोपांवरून चौकशी सुरू असलेले काँग्रेसच्या नेत्यांची मोठी रांगच आहे. या नेत्यांविरोधात देखील मोठी कारवाई झाल्यास काँग्रेस पक्ष रिकामा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

काँग्रेस पक्षात ‘टॉप-टू-बॉटम’ नेत्यांवर विविध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी जामीनावर बाहेर आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यासंदर्भात विधान केले होते. काही लोक जामीनावर बाहेर फिरत आहेत. गैरव्यवहार करणाऱ्यांना गेल्या पाच वर्षांत तुरुंगाच्या दाराशी आणून सोडलं आहे. पुढल्या पाच वर्षांत दोषी तुरुंगात दिसतील, असं ही मोदी म्हणाले होते. आता त्याचीच प्रचिती येत असल्याचे चर्चा आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा विचार केल्यास हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरातसोबत महाराष्ट्रातही काँग्रेसचे बडे नेते सीबीआय, इनकम टॅक्स आणि ईडी सारख्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. चिदंबरम यांच्या पाठोपाठ या तपास यंत्रणा अन्य काँग्रेस नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरण – 2011

sonia-and-rahul

या प्रकरणात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य काँग्रेसचे नेते अडकले आहेत.

हेलिकॉप्टर घोटाळा:

ahmed-patel

ऑगस्टा वेस्टलँड व्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरण 2013 मध्ये उघड झाले होते. या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

अॅम्ब्युलन्स घोटाळा :

ashok-gehlot

2010 ते 2013 या कालावधीत एनआरएचएम अंतर्गत अॅम्ब्युलन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी स्वास्थ्य मंत्री ए ए खान, श्वेता मंगल, शफी माथेर आणि एनआरएचएम यांच्या विरोधात भादंवि अंतर्गत कलम 420, 467, 468, 471 आणि 120 (बी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण (कर्नाटक)

shivkumar14

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेता म्हणून ओळखले जाणारे डीके शिवकुमार यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 2017 मध्ये आयकर विभागाने त्यांच्या 64 ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली होती.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण (हिमाचल प्रदेश)

virbhadra

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून आधीच तपास सुरू आहे. सप्टेंबर 2015 मध्ये त्यांच्या मुलीच्या लग्नावेळी सीबीआयने छापे टाकून खळबळ उडवून दिली होती. हा तपास अद्याप सुरू आहे.

लाच प्रकरण

harish-rawat

उत्तराखंडमधील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात सीबीआयच्या कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात 2016 मध्ये विश्वासदर्शक ठरावावेळी बंडखोर आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत.

जमिनीची सौदेबाजी

bhupinder-singh-hooda

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या विरोधात गुरुग्राम येथील जमिनीच्या सौदेबाजीमध्ये आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी तपास सुरू आहे.

भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

jagdish tytler

काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे जगदीश टाइटलर हे देखील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेले आहेत. जगदीश टाइटलर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून देखील दिलासा मिळाला नसून कनिष्ठ न्यायालयाला या प्रकरणी एक वर्षाच्याआत सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराचे हे प्रकरण 2009 च्या दरम्यानचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या