मास्क नसल्याने पेट्रोल देण्यास नकार दिला, तरुणांनी पेट्रोल पंपावर केली तोडफोड

सगळ्या पेट्रोल पंपांवर आपल्याला ‘मास्क नसल्यास पेट्रोल मिळणार नाही’ असा बोर्ड पाहायला मिळतो. कर्मचारी आणि ग्राहकांच्या आरोग्याची काळजी असल्याने तशी सक्तीच पेट्रोलपंप चालकांनी केली आहे. वसई पश्चिमेकडे असलेल्या माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोलपंपावरही हा नियम पाळला जात आहे. मात्र या निमयामुळे काही तरुणांनी या पेट्रोल पंपाची तोडफोड केली.

शुक्रवारी रात्री नालासोपाऱ्य़ातील काही तरुण पेट्रोल भरण्यासाठी आले होते. त्यांच्या तोंडावर मास्क नसल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्या पेट्रोल देण्यास नकार दिला. या गोष्टीच्या राग आल्याने या तरुणांनी पंपावर तुफान राडा घातला. त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि पंपावरील सामानाची व फिलिंग मशीनची तोडफोड केली. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या