क्रेडिट कार्ड कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी नोटाबंदी!

14

सामना ऑनलाईन । पुणे

अमेरिकेने कायदा करून क्रेडिट कार्ड कंपन्या आकारत असणाऱया कमिशनवर निर्बंध आणले. त्यामुळे या कंपन्यांना एका वर्षात 15 बिलियन डॉलरचा तोटा झाला. हा तोटा भरून काढण्यासाठी हिंदुस्थानात नोटाबंदी करण्यात आली, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर केला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हिदुस्थानभेटीत यासंदर्भात काही करार झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या