नोटाबंदी टीव्हीवर झळकली

68

सामना ऑनलाईन । मुंबई

टीव्ही हा समाज जीवनाचा आरसाच मानला जातो. त्यामुळे नुकत्याच ५०० आणि १०००च्या नोटा बाद करण्याच्या निर्णयाचा परिणाम टीव्ही मालिकांवर दिसत आहे. म्हणजे अनेक मालिकांनी आपल्या संभाषणात नोटाबंदीचा उल्लेख केला आहे.

काहे दिया परदेस

सध्या प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘काहे दिया परदेस’मध्ये नोटाबंदीने नवे वळण घेतले. ‘निशा’ आणि तिच्या आईने सावंत कुटुंबाचे पैसे घरात लपवून ठेवलेले आहेत. याच वेळी नोटाबंदी लागू झाल्याने त्या दोघींची कशी फजिती होते, हे या मालिकेतून सध्या दाखवण्यात येत आहे. त्यामुळे नेहमीच्याच वळणावर जाणाऱ्या मालिकेत पुन्हा नवा रंग भरला आहे.

जिंदगी की महक

या मालिकेतल्या हरीशकडे (अजित कुरेशी) ५०० आणि १०००च्या नोटांनी भरलेली सूटकेस असते. ते बघून करूणा घाबरते आणि या नोटांचं वाटप गरीब, भिकाऱ्यांमध्ये करून टाकू, असा सल्ला ती देते.

आपली प्रतिक्रिया द्या